Episodes

  • #1625 : उजवा की डावा हात? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 18 2024

    Send us a text

    तुम्ही तुमचा सकाळचा कॉफीचा मग कसा उचलता, डाव्या हाताने की उजव्या? आपण अगदी यांत्रिकपणे करतो ही क्रिया.. पण तरीही, कोणी न कोणी हे ठरवत असेलच ना..? मग कोण बरं ठरवतं हे? आजकाल कसं, सगळं अगदी जेनेटिक लेव्हल पर्यंत पाहिलं आणि तपासलं जातं. मग तुमचे जीन्स किती प्रमाणात हे सगळं म्हणजे, डावखुरेपण वगैरे ठरवतात याचा विचारही होऊच शकतो.

    Show More Show Less
    7 mins
  • #1624 : कालबाह्यतेचा सापळा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 17 2024

    Send us a text

    आपल्या लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता तो पेन कचऱ्यात फेकून नवा पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आज ही मी जेव्हा पेन च्या रिफिलचा शोध घेत फिरतो तर बहूतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत. कारण तेच. मग दुप्पट किंमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल ?
    या "नियोजित अप्रचलन" नावाच्या विकृत व्यापार फंड्यामूळेच.. ‘वापरा आणि फेका’ ... नावाचा 'भस्मासुर' जन्माला आला.

    Show More Show Less
    10 mins
  • #1623: गिरनार परिक्रमा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 16 2024

    Send us a text

    भवनाथ म्हणजे तलेटी, येथील दुधेश्वर शिवमंदिरापासून प्रदक्षिणेला सुरूवात करतात. गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेऊन त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा करणे असे म्हणतात. पुरातन काळापासून सदर परिक्रमा चालू आहे
    गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे. जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखत्यारीत आहे.
    वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही;
    फक्त या परिक्रमेच्या कालावधीत ५ दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो.
    या जंगलात मुंगी, विंचू या पासून अगदी सिंहा पर्यंत भरपूर प्राणी आहेत, पण या ५ दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. ही दत्तगुरूंचीच कृपा आहे.
    देव आणि त्यांचे गण हे सुध्दा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे.

    Show More Show Less
    7 mins
  • # 1622: म्हणून पृथ्वीच्या फिरण्याचा वेग झाला कमी? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 12 2024

    Send us a text

    जेव्हा थ्री गॉर्जेस धरण बांधले गेले तेव्हा यांग्त्झी नदीचे 42 बिलियन टन पाणी त्या धरणाच्या मागे समुद्रसपाटीपासून 175 मीटरपर्यंत अडवले गेले. यामुळे पृथ्वीचा जडत्वाचा क्षण थोडासा बदलला, ज्यामुळे पृथ्वीचं रोटेशन अधिक हळू होतंय. पृथ्वीचे परिभ्रमण कमी झाल्यामुळे, एका दिवसाची वेळ 0.06 मायक्रोसेकंदने वाढली आहे. म्हणजेच दिवस आता काही क्षणांनी मोठा झाला आहे. थ्री गॅार्ज डॅमच्या बांधकामामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुव देखील आपापल्या ठिकाणाहून प्रत्येकी 2 सेंटीमीटर सरकले आहेत असेही म्हटले जाते. याशिवाय पृथ्वी उत्तर ध्रुवावर थोडीशी सपाट झाली आहे.

    Show More Show Less
    7 mins
  • # 1621: जनुकांचे नियंत्रण करणारी बटणं. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 8 2024

    Send us a text

    प्रश्न असा येतो की मेंदू काय, हृदय काय, यकृत काय... सगळ्यांकडे जनुकांचा तोच वारसा असतो. मग ते नियमित नाही तरी अडअडचणींत तरी एकमेकांची काम का करू शकत नाहीत? आणि तसंच पाहिलं तर नियमितपणेही ते आपलं वेगळेपण कसं काय टिकवून ठेवतात? हे कोडं वैज्ञानिकांना कित्येक वर्षं सतावत आहे. त्याचं एक उत्तर शोधून काढणाऱ्या व्हिक्टर अँम्ब्रोज आणि गॅरी रुव्हकून या दुकलीला यंदाच्या वैद्यकीय नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

    Show More Show Less
    9 mins
  • # 1620: ‘रंग बदलू‘ मंडळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 8 2024

    Send us a text

    जगात प्रत्येक जीवाकडे आपली अशी एक खास कला असते. या कलेच्या माध्यमातून ते त्यांचं जीवन सुरक्षितपणे जगत असतात. असंच हे एक खास गिफ्ट सरड्यांना निसर्गाकडून मिळालं आहे. असं मानलं जातं की, सुरक्षेनुसार सरडे त्यांचा रंग बदलतात. शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी सरडे जिथे बसलेले असतात, आपोआप ते त्या रंगात स्वत:ला सामावून घेतात. सरडे त्यांचा रंग बदलून स्वत:चा बचाव करतात. सरडे आपलं पोट भरण्यासाठी शिकारही करतात. शिकार करताना देखील सरडे त्यांचा रंग बदलतात. ज्याने शिकार पळून जात नाही. त्यामुळे सरडे शिकार सहजपणे करू शकतात.

    Show More Show Less
    8 mins
  • 1619: ‘आपली राष्ट्रीय दांभिकता.' कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Nov 6 2024

    Send us a text

    देशाच्या प्रगतीचे मापन करायचे झाले तर नागरिक काय लायकीचे काय लायकीचे आहेत या निकषावर करायला हवे.
    पाहता आपल्या नागरिकांचे सार्वजनिक उद्योग?
    रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे,
    गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे,
    ऐतिहासिक इमारतींवर स्वत:चे आणि स्वत:च्या टिनपाट मैत्रिणीचे नाव कोरणारे,
    कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करून पाणी न टाकता निघून जाणारे, शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे.....
    ही यादी कितीही लांब होऊ शकते......

    Show More Show Less
    5 mins
  • # 1618: फालतू वाटणारी गोष्ट सुद्धा जगाला पुढे नेऊ शकते. लेखक : अनामिक. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) )
    Nov 6 2024

    Send us a text

    पियाँटिक ह्या जनरल मोटर्सच्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली. माझ्या गाडीला व्हॅनिला आईसक्रीम आवडत नाही. इंजीनिअरने परत परत गाडी चेक केली, पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे.
    आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. .....

    Show More Show Less
    4 mins